Thursday, September 13, 2018

Vitarag Aarti -वितराग आरती

वितराग आरती

वितराग जिन ! दीपार्चन हे, मंगल तव चरणीं , अर्पण तव चरणीं
शांतीसुधेच्या मधुरा स्वादा , देते दिनरजनी ।। शांति ।। धृ. ।।

अगण्यगुणगण प्रभा जीवांच्या , नाशवी मोहात , ज्ञानामृत देते
सकल जीवातें शिवपुर - मार्गा , प्रेमे दर्शविते (२) ।।१।।

शुभ भावांची ज्योत तेवूनी , भक्तिरूपी घृत ते, भक्तिरूपी घृत ते।

ओतुनी प्रेमें करितां आरती स्वगुणा  प्रगटवितें (२)।।२।

वितराग जिन ! दीपार्चन हेमंगल तव चरणीं , अर्पण तव चरणीं 
शांतीसुधेच्या मधुरा स्वादा , देते दिनरजनी ।। शांति ।। धृ।।
ब्लॉगर - सौ. शरयु आशिष तडकल 
            पुणे 

Marathi laghu Samayik Path - सामायिक पाठ

लघु सामायिक पाठ ( मराठी )

नमोस्तु सिद्धास ऋषीगणांस त्रिकाल जे वंद्य तिन्ही जगास ।।
 जेणे मनाला स्थिरता रहाते करीन सामायिक शांतचित्ते ।।१।।


संपूर्ण जीवांवर साम्यभाव धरीन वा संयम शांतभाव
मी आर्त रौद्र प्रकृती त्यजीन त्रिकाल सामायिक आचरीन ।।२।।

सर्वांवरी मी  समता धरीन कुणावरी  वैर मी करीन
आशा महपाश झनीं  त्यजीन होईन मी नित्य समाधिलीन ।।३।।

जे जीव रागादीविकारभावें मी हाय रे ! दुखविलें असावें ।।
ते सर्व माझ्यावरती  क्षमोत क्षमीन मी त्यांसहि  एकचित्त ।।४।।

मनोवच:कायकृतानुमोदें रत्नत्रयीं  दोष घडे प्रमादे ।।
ते दोष मी आज मुखे वदून निंदा नि गर्हा करुनि त्यजीन ।।५।।

तिर्यंच वा मानव, देव यांची पीडा जहाली तरि  ही  मनाची ।।
एकाग्रता निश्चल मी धरीन कषाय, आहार , तनू  त्यजीन ।।६।।

अनेक रागादि  विकार भाव प्रहर्ष, औत्सुक्य , भय  प्रभाव ।।
दीनत्व  मात्सर्य , विकार  किंवा सोडून देतों अरती रती वा ।।७।।

मृत्यू  जरा , जन्म सदा जगात यांची कधी भीति नसो मनातं ।।
मी लाभ हानी सुख दुःख यांस समान लेखीन विषामृतास ।।८।।

दृगण्यान -चारित्र्य - तप:स्वरूप आत्मा तथा संवर योगरूप ।।
आनंदरूपात्मक निर्विकल्प आत्मा असे हा परमात्मरूप  ।।९।।

आत्मा सदा शाश्वत एकरूप याहून तें शेष अनेकरूप ।।
वियोग संयोग विभावरूप जीवास नाना करिती विकल्प ।।१०।।

संयोगसंबंध असे जीवाला म्हणून दुःखे असती तयाला ।।
संयोगसंबंध म्हणून आतां सोडून देतो समतेकरितां  ।।११।।

एवंच सामायिक हें अखंड चालू असो यांत असो ना खंड ।।
मुक्ती-वधूला वशचूर्ण होवो हे नित्य सामायिक शांति देवो ।।१२।।

                               
                               इष्ट प्रार्थना

शास्त्राभ्यास जिनेंद्र-संस्तव सदा आर्यांसवें  संगती
 साधूंचे गुण-गान दोषकथनीं अत्यंत मुकस्थिती

सर्वांशी हित मिष्ट भाषण असो आत्म्यामधे  भावना
जन्मोजन्मी  असे निरंतर घडो जों मुक्तीची साधना ।।१३।।

तव पदयुग मम मानसीं मम मानस तव पदद्वयीं लीन  
राहो जिनेंद्र तोंवरि होईल संप्राप्त मुक्तिचे सदन ।।१४।।

अक्षरपदार्थांहीं  मात्राहीं  हीन हें असे कवन

भगवती देवी मजला क्षमा करो तेंवि  दु:खपरिहरण ।।१५।।

ब्लॉगर - सौ. शरयु आशिष तडकल 

Wednesday, September 12, 2018

चोवीस तीर्थांकर लांछने 

चोवीस तीर्थांकर लांछने 

चोविस तीर्थंकर चे नाव आणि त्यांचे चिन्ह  लक्षात  राहण्याकरीता  ही चोविसी आपल्या  बालकांना शिकवायला हवी -

वर्तमान चोवीस जिनांचे लांछन चोवीस भव्य जनांना नित्य स्मराया केले कवनास ।।१।। 

वृषभ जिनाला बैल शोभतो, हत्ती अजितास संभवनाथा घोडा, वानर अभिनंदन प्रभुस ।।२।।
सुमति जिनेंद्रा चकवा पक्षी , पद्म पद्मप्रभुला देव सुपार्श्व स्वस्तिक साजे , चंद्र चंद्रप्रभूला ।।३।। 
पुष्पदंत पदिं मगर विराजे , शीतल श्रीवृक्ष श्रेयांसाते गेंडा चिन्ह ते , वासुपूज्य महिष ।।४।।
विमल जिनाचे सुकर लांछन , अनंत सायाळ वज्र चिन्ह ते धर्मजिनाचे , शांती हरीण बाळ ।।५।।
कुंथूनाथा बकरा शोभे , अरहनाथ मीन  मल्लि कुम्भ , मुनिसुव्रत कासव , नमिस नीलकमल ।।६।।
नेमीजीनातें शंख शोभते , पार्श्वा सर्पफणा नमस्कार त्या वीर प्रभूच्या सिंहांकित चरणा ।।७।।

ब्लॉगर - शरयु आशिष तडकल 

            पुणे 

Tuesday, September 11, 2018

Namokar Mantra- णमोकार महामंत्र


सर्वकार्य सिद्धिकारक दुःख निवारक असा णमोकार महामंत्र प्राकृत भाषेत 
णमो अरिहंताणं,
णमो सिद्धाणं,
णमो आयरियाणं,
णमो उवज्झायाणं,
णमो लोए सव्व साहूणं,
एसो पंच णमोक्कारो, सव्व पाव-प्पणासणो।
मंगलाणं च सव्वेसिं, पढमं हवइ मंगलं॥

ब्लॉगर - सौ. शरयु आशिष तडकल 
            पुणे