श्री आदिनाथ प्रभू आरती (Shri Adinath Prabhu Aarti)
जय देवा आदिनाथा तुझ्या चरणी माझा माथा
जय देवा आदिनाथा तुझ्या चरणी माझा माथा
आरती ओवाळीता हर्ष वाटे माझे चित्ता जय देवा आदिनाथा नाभिराया तुझा पिता मरू देवी तुझी माता अयोध्येत जन्म घेता दहा अतिशय नाथा जय देवा आदिनाथा युगलाधर्म निवारीला षट कर्माचा स्थापियेला भव्यजन बोधायला प्रथम तीर्थंकर झाला जय देवा आदिनाथा नेमसागर महामुनी त्यांचे लक्ष जिनचरणी नरहरदास लोटांगणी लीन असे सद्गुरु चरणी जय देवा आदिनाथा